राजापूर : सध्या कांदा बियाणांसाठी शेतकरीवर्गाची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू आहे. चांगल्याप्रतीचे व विश्वासार्ह कांदा बियाणांचा शोध घेताना शेतकरी दिसत आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा बियाणांसाठी डोंगळे लावले होते. मात्र, पाणी कमी पडल्याने बियाणांचे प्रमाण कमी झाले. लाल कांदा बियाणांमध्ये दोन प्रकार आहेत. एक भुरकट लाल, तर दुसरे लालभडक. भुरकट लाल रंगाचेआठ हजार रु पये पायली, तर शेतकऱ्यांनी घरगुती तयार केलेले खात्रीशीर लालभडक कांदा बियाणांचा दर हा २५०० रुपये किलो म्हणजे दहा हजार रु पये पायलीआहे.दरवर्षी राहुरी येथे महात्मा जोतिराव फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे वाटप होत असते. मात्र यावर्षी बियाणे वाटपाची तारीख जाहीर झालेली नाही. गतवर्षी राहुरी विद्यापीठातील कांदा बियाणांचा दर बाराशे रुपये प्रतिकिलो होता. यावर्षी दरवाढ होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाचे कांदा बियाणे परवडणारे, खात्रीशीर व उगवणक्षमता चांगली असणारे असल्याने शेतकरीवर्ग त्यास पसंती देतो.यंदा कोरोनाने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. लॉकडाउनमुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. काही शेतकºयांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने, भविष्यातही कांद्याला चांगले दिवस येतील, या आशेने शेतकरीवर्ग कांदा बियाणांच्या शोधात आहे.
राजापूर परिसरातील शेतकरी कांदा बियाणांच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:18 IST