शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा आयातीच्या मुदतवाढीला शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:16 IST

आंदोलनाचा इशारा : निर्यातबंदी हटविण्याची मागणी

ठळक मुद्देकेंद्र सरकारने १४ सप्टेंबर २०२० रोजी कांदा निर्यात बंदी जाहीर केली.

लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी जोर धरू लागली असतानाच केंद्र सरकारने आयात कांद्याला दिलेल्या सवलतींना मुदतवाढीचा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची प्रतिक्रिया राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली असून या निर्णयाविरोधात येत्या सोमवार (दि.२१) राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.केंद्र सरकारने गुरूवारी आयात कांद्यासाठी दिलेल्या सवलतीच्या नियमांना ३१ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. याबाबत भारत दिघोळे यांनी म्हटले आहे, केंद्र सरकारने १४ सप्टेंबर २०२० रोजी कांदा निर्यात बंदी जाहीर केली. त्यावेळी केंद्रातील व राज्यातील भाजपाचे अनेक नेते ही निर्यात बंदि तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे सांगत होते. परंतु, सरकारने निर्यातबंदी उठविणे तर दूरच परदेशातून कांदा आयात करण्याच्या सवलतींना मुदतवाढ दिलेली आहे. याशिवाय, कांदा व्यापाऱ्यांवर साठा मर्यादेची अट घालून कांद्याचे दर पाडण्याचे काम करण्यात आले.कांद्याची टंचाई व वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कांद्याच्या भावात थोडीशी उसळी आल्यानंतर पुढे मात्र सातत्याने कांद्याचे बाजार भाव कमी होत असून आजमितीला कांद्याला सरासरी १५०० रूपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादकांची केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदी हटवावी अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभर उग्र आंदोलन होतील, असा इशाराही दिघोळे यांनी दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा