शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: October 26, 2016 00:25 IST

काळी दिवाळी : ...अन्यथा मंत्र्यांसमोर आंदोलन

नाशिक : पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या एक लाख शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी नाशिक जिल्हा विविध विकास सेवा सहकारी सोसायटी संघटना व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी विविध माध्यमांतून प्रयत्न केले, परंतु त्यांना दाद मिळत नसल्याने उपोषण आंदोलन करावे लागले. जिल्हा बॅँकेने पीक कर्जाचे वाटप ३० सप्टेंबरपर्यंत तर द्राक्ष उत्पादकांना ३० डिसेंबरपर्यंत कर्जाचे वाटप करणे क्रमप्राप्त असताना प्रत्यक्षात जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप होऊ शकलेले नाही. यासंदर्भात पालकमंत्री, सहकारमंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला, परंतु आश्वासनापलीकडे काहीच पदरी पडू शकले नाही. सध्या शेतकऱ्यांना द्राक्षबागेचे छाटणीचे काम, डीपिंग, फवारे व औषधासाठी कर्जाची अत्यंत आवश्यकता असून, कर्ज मिळत नसल्याने सावकाराकडून शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून नियमित कर्जफेड करणारे शेतकरी दुसऱ्या बॅँकेकडे निघून गेले तर सोसायट्या अडचणीत येतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे अन्यथा राज्य व केंद्रातील मंत्र्यांसमोर शेतकरी आंदोलन करतील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.या आंदोलनात विष्णुपंत गायखे, राजू देसले, सुरेश रायते, संपतराव वक्ते, मधुकर शिंदे, राजाराम रायते, मनोहर देवरे, पोपट राजोळे, सचिन खालकर, निवृत्ती धनवटे, भास्करराव शिंदे, बाबुजी खैरे, अशोक जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)