Farmers are losing due to production of tomatoes and other crops | टोमॅटो अन् इतर पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकरी तोट्यात

टोमॅटो अन् इतर पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकरी तोट्यात

ठळक मुद्देशेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले

खेडलेझुंगे : खेडलेझुंगेसह, सारोळे थडी, कोळगांव, रु ई, धारणगांव विर-खडक परिसरात सुरवातीला प्रखर उन्हाच्या तीव्रतेने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पीकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतिपके जळुन गेलीत. शेतिपक उन्हाच्या तडाख्यातुन वाचिवतांना शेतकर्यांना वेळप्रसंगी टँकरणे पाणी द्यावे लागले होते. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागले होते.
सद्या परतीच्या पावसाने शेतकर्यांना हैराण करु न सोडलेले आहे. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके शेतातच सोडुन द्यावी लागत आहे. टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर टोमॅटो फुलोर्यात असताना सततच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर फुलगळ झाली. त्यामुळे सुरवातीला सुरु होणारे टोमॅटो पिक उशिराने सुरु झाले. त्यात झाडांची फळ देण्याची कमकुवत शक्तीमुळे उत्पादन कमी झाले. सुरवातीलाच आलेला फुलोरा वाचिवण्यात शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर किटकनाशके आण िइतर अत्यावश्यक औषध, खतांचा खर्च अफाट झाला. पुन्हा तेव्हढाच अफाट खर्च करु न शेतकरी टोमॅटो उत्पादन घेत आहे. फळ परिपक्व होण्यासाठी पाण्याचा ताण द्यावा लागतो परंतु सततचा पावसामुळे सुरवातीपासूनच टोमॅटो उत्पादन कमी झालेले आहे. त्यात पिकलेली टोमॅटो कावळे व इतर पक्षी खात आहे. त्यामुळे बर्याच शेतकर्यांनी पक्षी येवु नयेत म्हणुन टोमॅटो झाडाला तारीला बांधतांना रंगबेरंगी सुतळी, चिंधकांचा वापर केलेला दिसुन येत आहे. कुठे बुजगावणे उभे करण्यात आलेले आहे.
टोमॅटोसह सोंगणीला आलेल्या बाजर्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वळव्याच्या पावसामुळे खाली चिख्खल आण िवर पक्षी कणसातून दाणे टिपून कणसे मोकळी करत आहे. काढणीला आलेली सोयाबीन चिख्खलामुळे कापणी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. कृषी विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पीकांची पहानी करु न पंचनामे करणे गरजेचे आहे.
 

Web Title: Farmers are losing due to production of tomatoes and other crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.