विल्होळी शिवारात शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:33 IST2019-03-16T01:32:56+5:302019-03-16T01:33:53+5:30

विल्होळी-पाथर्डी शिवारात गुरुवारी (दि.१४) एका शेतमजुराने बाभळीच्या झाडाला तारेच्या साह्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Farmer suicides in Vilholi Shivaraya | विल्होळी शिवारात शेतमजुराची आत्महत्या

विल्होळी शिवारात शेतमजुराची आत्महत्या

नाशिक : विल्होळी-पाथर्डी शिवारात गुरुवारी (दि.१४) एका शेतमजुराने बाभळीच्या झाडाला तारेच्या साह्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विल्होळी-पाथर्डी शिवारातील शेतकरी एकनाथ भावनाथ यांच्या शेतात काम करणारा शेतमजूर पोपट सुखदेव भोये (३५) याने बाभळीच्या झाडाला तारेच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. दारूचे वेसन असल्याने हलाखीची आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक वादाला कंटाळून भोये याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जयराम विष्णू सहाणे यांनी खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर या प्रकरणी मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Farmer suicides in Vilholi Shivaraya