उगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:39 IST2018-08-10T22:37:17+5:302018-08-10T22:39:23+5:30
निफाड तालुक्यातील उगांव येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

उगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या
बिरार यांची उगांव येथे दीड एकर शेती आहे . सदर शेतीच्या पिकांसाठी त्यांनी विविध बँकांचे पाच लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. याशिवाय उधार उसनवारीने एक लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यातच कर्जवसुलीसंदर्भात त्यांना बँकेच्या नोटीसा येऊ लागल्याने ते खचले होते. या चिंतेत दि. ९ रोजी त्यांनी मध्य रेल्वे मार्गावर शिवडी शिवारात आत्महत्या केली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला. खिशात मी कर्जबाजारीपणाला कंटाळुन आत्महत्या करीत असून माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये अशा आशयाची चिठ्ठी आढळुन आली आहे. निफाड येथील उपजिल्हा रु ग्णालयात शुक्र वारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांकडे देण्यात आला. उगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.