त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 12:39 IST2019-03-26T12:38:15+5:302019-03-26T12:39:21+5:30
त्र्यंबकेश्वर : ऐन धुळवडीच्या दिवशी तालुक्यातील चाकोरे शिवारात आपल्या शेतातील गहु ऊसाची पाहणी करण्याकरिता गेलेल्या सुका महादु खाडे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्यात शेतकरी जखमी
त्र्यंबकेश्वर : ऐन धुळवडीच्या दिवशी तालुक्यातील चाकोरे शिवारात आपल्या शेतातील गहु ऊसाची पाहणी करण्याकरिता गेलेल्या सुका महादु खाडे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले. बिबट्याने कुत्र्यावर झेप घेतली पण ती झेप खाडे यांच्यावरच पडली. कुत्रे पळाले पण खाडे या इसमाचा पाय हाताला चावा घेतला. पाठीला पायाचा पंजा लागल्याने नखे ओरबडल्यामुळे पाठीला देखील जखम झाली. तालुक्यातील अंबई काचुर्ली शिवारात बिबट्याचा धुमाकुळ सुरूच आहे. तथापि वन विभागाने आपली काळजी घ्या. आपली जनावरे रानात सोडु नका असा सल्ला दिला होता. पण बिबट्याला पकडण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तालुक्यात किमान दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता असून परिसरात तातडीने पिंजरे लावावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.