शेतकऱ्याची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 00:04 IST2020-12-09T23:59:56+5:302020-12-10T00:04:11+5:30
येवला : तालुक्यातील धुळगाव येथील शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शेतकऱ्याची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल
ठळक मुद्दे सदर धनादेश दोनदा बँकेत न वटल्याने पैशांची वेळोवेळी मागणी केली.
येवला : तालुक्यातील धुळगाव येथील शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्याविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
धुळगाव येथील शेतकरी प्रशांत गायकवाड यांनी त्यांच्या शेतातील टरबूज व्यापारी सुरेंद्र सूर्यवंशी यांना विकले. त्या बदल्यात सूर्यवंशी यांनी थोडे पैसे देऊन उर्वरित रकमेचा रुपये ७८ हजार रुपयांचा धनादेश गायकवाड यांना दिला. मात्र, सदर धनादेश दोनदा बँकेत न वटल्याने गायकवाड यांनी सूर्यवंशी यांच्याकडे पैशांची वेळोवेळी मागणी केली. पैसे न मिळाल्याने गायकवाड यांनी पोलिसांत आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदविला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.