नांदुर्डी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:34 IST2020-11-26T00:33:45+5:302020-11-26T00:34:55+5:30
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किशोर भास्कर कुंभार्डे (३५ ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

नांदुर्डी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
निफाड : तालुक्यातील नांदुर्डी येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किशोर भास्कर कुंभार्डे (३५ ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कुंभार्डे यांनी मंगळवारी (दि.२४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले.
किशोर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या कुटुंबावर बँकेचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी निफाड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप निचळ हे अधिक तपास करीत आहेत.