कीटकनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 01:51 IST2022-05-13T01:51:09+5:302022-05-13T01:51:47+5:30
मालेगाव तालुक्यातील नाळे येथील निवृत्ती चैत्रराम जाधव (वय ४०) या शेतकऱ्याने कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केली.

कीटकनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या
मालेगाव : तालुक्यातील नाळे येथील निवृत्ती चैत्रराम जाधव (वय ४०) या शेतकऱ्याने कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केली. त्याने राहत्या घरी विषारी कीटकनाशक औषध सेवन केल्याने त्यास त्याचा भाचा अंबरनाथ बन्सी बागुल (रा. नाळे) याने सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक फुलमाळी करीत आहेत. मंगळवारी (दि. १०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.