झोडगे गावातील तीन कोरोना रुग्णांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:28 IST2020-07-08T21:39:57+5:302020-07-09T00:28:07+5:30

झोडगे : झोडगेसह जळकू येथे आढळून आलेल्या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संपूर्ण बरे झाल्यानंतर बुधवारी ग्रामीण रुग्णालय झोडगे येथून घरी पाठवण्यात आले. यावेळी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Farewell to three Corona patients from Zodge village | झोडगे गावातील तीन कोरोना रुग्णांना निरोप

झोडगे गावातील तीन कोरोना रुग्णांना निरोप

झोडगे : झोडगेसह जळकू येथे आढळून आलेल्या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संपूर्ण बरे झाल्यानंतर बुधवारी ग्रामीण रुग्णालय झोडगे येथून घरी पाठवण्यात आले. यावेळी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या हातून ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून घेण्यात आले. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. परिसरातील ग्रामस्थांमध्ये कोरोना-विषयी लढ्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेकजण आजही कुठलेच नियम पाळत नसून तोंडाला मास्कसुद्धा लावत नाहीत याकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे किंवा दंडात्मक कारवाई केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Farewell to three Corona patients from Zodge village

टॅग्स :Nashikनाशिक