शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

फेरनियोजन राहणार कागदावरच ?

By admin | Updated: September 10, 2015 00:09 IST

पोलीस बंदोबस्त : येणाऱ्या गर्दीवरच असेल बंदोबस्ताची भिस्त; ऐनवेळी धावपळीची शक्यता

नाशिक : पहिल्या पर्वणीला अपेक्षित गर्दी नसतानाही पोलिसांनी बंदोबस्ताचा केलेला अतिरेक, सामान्य नागरिकांसह भाविकांचे झालेले हाल आणि पायपीट. परिणामी माघारी गेल्यानंतर भाविकांनी नाशिकची कुप्रसिद्धीच केली़ मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्यानंतर पोलीस आयुक्तांनी बंदोबस्ताचे फेरनियोजन केले़ भाविक व स्थानिकांच्या दृष्टिकोनातून अनेक सहजसुलभ बदल फेरनियोजनात केले असले तरी गर्दीनुसार तो केला जाणार असल्याने ते केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे़सिंहस्थ बंदोबस्तासाठी आलेल्या रिक्रूटला शहराची नसलेली माहिती, अनुभवी कर्मचाऱ्यांची न मिळालेली साथ, जागोजागी बॅरिकेडिंग यामुळे केवळ भाविकांच्या पायपिटीत भर पडली नाही तर स्थानिक नागरिकांना आपल्या घरातच स्थानबद्ध व्हावे लागले़ संपूर्ण रोड खुला असताना दूधविक्रेत्यांसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना पोलिसांनी अडवून ठेवले़ पर्वणीत भाविकांच्या गर्दीमुळे शहराच्या अर्थकारणात मोठी भर पडेल, ही आशा पोलिसांच्या नियोजनामुळे फोल ठरली़ त्यामुळे पोलिसांना सर्वांच्याच टीकेचे धनी व्हावे लागले़पोलीस यंत्रणेवर मंत्र्यांसह सर्वांनीच केलेल्या टीकेतून धडा घेऊन शहाणे झालेल्या पोलीस आयुक्तांनी दुसऱ्या पर्वणीसाठी बंदोबस्ताचे फेरनियोजन केले आहे़ त्यामध्ये वाहतुकीचे मार्गनिहाय नियोजन करण्यात आले आहे़ बाह्य वाहततळावरून अंतर्गत वाहनतळापर्यंत येण्यासाठी बससेवा तसेच नाशिककरांची स्थानबद्धतेवर उपाय म्हणून शहरांतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार सुमारे १८० बसेसमधून ही वाहतूक केली जाणार आहे़ अंतर्गत बसस्थानक ते घाटापर्यंतचे अंतर कमी करण्यात आले असून, त्यासाठी प्लॅन अ व प्लॅन ब असे दोन आराखडे तयार करण्यात आले आहेत़ भाविकांच्या संख्येनुसार यातील कोणता प्लॅन सुरू ठेवायचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे़ (प्रतिनिधी)