Meghraj Bafna: प्रख्यात शाहीर मेघराज बाफना यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 11:00 IST2022-01-26T11:00:33+5:302022-01-26T11:00:45+5:30
शाहीर गजाभाऊ बेणी आणि शाहीर मेघराज बाफणा ही जोडगोळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होती.

Meghraj Bafna: प्रख्यात शाहीर मेघराज बाफना यांचे निधन
नाशिक- महाराष्ट्रातील प्रख्यात शाहीर मेघराज बाफना यांचे आज सकाळी वृध्दापकाळतील अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात मुलगा राजेश , दोन मुली , जावई, नातवंडे असा परीवार आहे.
१९४८मध्ये रविकिरण मेळ्यात बाल कलावंत म्हणून मेघराज बाफना यांनी काम करण्यास सुरुवात केली. १९५२ मध्ये त्यांनी स्वतःचा साईनाथ मेळा स्थापन केला. पुढे १९५६ ला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये ते सहभागी झाले आणि लोक लोकनाट्याच्या माध्यमातून, कलापथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संदर्भात जनजागृती करण्याचे काम त्यांनी शाहीर गजाभाऊ बेणी यांच्यासमवेत केले. त्यानंतर १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी लोकमान्य कलापथकाद्वारे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक गाजलेल्या लोकनाट्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असायची.
शाहीर गजाभाऊ बेणी आणि शाहीर मेघराज बाफणा ही जोडगोळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. त्यांच्या लोककलेची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता.