धात्रक फाट्यावर पार्किंगच्या वादातून कुटुंबीयास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:35 IST2018-11-12T00:35:17+5:302018-11-12T00:35:43+5:30

विनापरवानगी चारचाकी पार्किंग केल्याचा जाब विचारणाऱ्या कुटुंबीयास तिघा संशयितांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) दुपारी धात्रक फाट्यावरील साकार रेसिडेन्सीत घडली़

Family hit the parking lot on the trail of a tractor | धात्रक फाट्यावर पार्किंगच्या वादातून कुटुंबीयास मारहाण

धात्रक फाट्यावर पार्किंगच्या वादातून कुटुंबीयास मारहाण

नाशिक : विनापरवानगी चारचाकी पार्किंग केल्याचा जाब विचारणाऱ्या कुटुंबीयास तिघा संशयितांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) दुपारी धात्रक फाट्यावरील साकार रेसिडेन्सीत घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित मनोज पवार, विलास पवार व मिलिंद पवार या तिघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बळीरामनगरमधील सुहास रणाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या रो-हाउसचे गेट खोलून त्यामध्ये संशयितांनी चारचाकी पार्क केली होती़ या चारचाकीबाबत सुहास रणाळकर व त्यांच्या पत्नी अर्चना यांनी विचारपूस केली असता याचा राग आलेल्या पवार बंधूंनी रणाळकर कुटुंबीयांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली़
या प्रकरणी आडगाव पोलिसांनी पवार बंधूंविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
एकास लाकडी दांडक्याने मारहाण
नाशिक : अंबड लिंक रोडवरील संजीवनगरमध्ये घरात घुसून दोघांनी एका इसमास मारहाण करून त्याच्या घरातील सामानाची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली़
किरण दिंडे (रा़ श्रमिकनगर, अंबड लिंक रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित सुनील कोटमे व अनिता कोटमे हे शिवीगाळ करीत घरात घुसले़ या दोघांनी दिंडे यांना लाकडी दांड्याने मारहाण करून घरातील सामानाची तोडफोड केली़

Web Title: Family hit the parking lot on the trail of a tractor