शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

मागणीअभावी दरात घसरण; कांदा उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:39 IST

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फटका बसत आहे.या कमी भावाची परिस्थिती अशीच राहील तर जिल्ह्यात चौदा कांदा बाजारपेठेत प्रतीदिनविक्र ी होणाºयाकांद्याच्या प्रतिक्विंटलमागे तीनशे त पाचशे रूपयांचे नुकसानीचा हिशोब केला तर महिन्यात कित्येक कोटीचा फटका बसणार आहे. आगामी काळात कांदा उपलब्धतेचे गणित कांदा टिकवण क्षमतेवर अवलंबून असणार असल्याचे जात आहे. उन्हाळ कांदा दीर्घ काळ टिकत असल्याने उत्पादकांना दोन पैसे अधिक मिळण्याची अपेक्षा असते. किमान उत्पादन खर्चापेक्षा त्यास जादा भाव मिळतो. गेल्या वर्षी मे ते जुलै या कालावधीत क्विंटलला सरासरी एक हजार ते १३०० रु पयांपर्यंत दर मिळाले होते. या वर्षी कोरोनाच्या संकटाने उत्पादकांचे गणित विस्कटले आहे.कांदा भाववाढीच्या अपेक्षेने चाळीत साठवला कांदामागील वर्षी उन्हाळ कांदा दरात शेतकऱ्यांनी मोठी दरवाढ अनुभवली. याच अपेक्षेने कांदा यावर्षीही साठवून ठेवला.कांदा उत्पादनही वाढले आहे.मात्र चाळीमध्ये साठवलेला कांदा विक्र ीस बाहेर न गेल्याने व पावसाळी वातावरणाने खराब होण्याची भिती आहे. त्यामुळे होणारे नुकसान वेळीच थांबविण्यासाठी कांदाचाळी फोडल्या जात आहेत. मात्र बाजारामध्येही अपेक्षित परतावा मिळत नसल्याने नाराजी आहे.मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले होते. दरात वाढ होऊनही उत्पादन खर्च वसूल झाला नव्हता. त्यामुळे पुढे दरात तेजी असल्याने व पाणीसाठा वाढल्याने शेतकºयांनी उन्हाळ कांदा लागवडीला पसंतीदिली.काढणीनंतर दराच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला. मात्र आता साठवलेला कांदा टिकवण क्षमतेअभावी खराब होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अनेक देशात निर्बंधामुळे निर्यात देखील थंडावली आहे. मे ते जुलै या कालावधीत सरासरी भाव गत वर्षीच्या तुलनेत ३०० ते ५०० रु पयांनी घसरले आहेत. त्यामुळे दराची पातळी सरासरी सातशे तर सर्वाधिक नऊशे रूपयांची आहे. प्रति क्विंटल पाचशे रूपयांचा फटका सहन करावा लागला .----------------------मार्चपर्यंत भारतातून निर्यात बंदी होती. निर्यातबंदीच्या काळात पाकिस्तानसह अन्य काही देशांनी भारतीय कांद्याची परदेशी बाजारपेठ काबीज केली. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेक देशात निर्बंध आहेत. याचा निर्यातीस फटका बसला. केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले होते. तेही बंद करण्यात आले असून निर्यातीला सरकारने प्रोत्साहन योजना जाहीर करून परकीय चलनाची भर घालणे आवश्यक आहे.- सुवर्णा जगताप,सभापती, लासलगाव

टॅग्स :Nashikनाशिक