शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

फज्जा : बेकायदेशीर कत्तलखाना विरोधी मोहीम

By admin | Updated: August 19, 2014 01:20 IST

मनपा-पोलीस पथक रिकाम्या हाताने परतले

मालेगाव : येथील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या प्रशासनाच्या गुप्त मोहिमेला ‘घरका भेदी’ मुळे फज्जा उडाला आहे. त्यामुळे शनिवारी भल्या पहाटे शहराच्या अंतर्गत भागात बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या महानगरपालिका व मालेगाव पोलीस दलाच्या दोनशे जणांच्या पथकास रिकाम्या हाताने परतावे लागले.शहरात मनपाचा एक अधिकृत तर अनेक अनधिकृत कत्तलखाने आहेत. यासंबंधीची संपूर्ण माहिती मनपा व पोलिस प्रशासनाला देखील आहे. उघडयावरील, लोकवस्तीतील बंदीस्त घरांमध्ये चालणाऱ्या या कत्तलखान्यातील रक्तमिश्रीत मांस सरळ गटारीद्वारे मोसमनदीपात्रात मिसळले जाते. उघड्यावरच निरुपयोगी मांसकचरा फेकला जातो. त्यामुळे जल - वायुप्रदुषण होवून साथीचे रोग पसरतात. यासंदर्भात वेळोवेळी विविध नागरिक व सामाजिक संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतरही मनपातर्फे कधी पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी तर कधी पोलिस बंदोबस्ताअभावी या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर थेट कारवाई करण्याचे टाळण्यात येत होते.मात्र अलिकडच्या काळात या बेकायदेशीर कत्तलखान्यांमुळे संपूर्ण शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरवासियांसोबत येथील विविध पाळीव प्राणीदेखील विविध आजारांनी त्रस्त आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तर शहरात मोठ्या प्रमाणात डास, चिल्टे, माशा व विविध किटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर मनपा प्रशासनातर्फे शहरातील कमालपुरा, कसाबवाडा व प्रभाग तीनच्या कार्यालयामागील सर्व्हे क्रमांक १६ चा परिसर या भागातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. पोलिस प्रशासनानेही बंदोबस्त पुरविण्याचे मान्य केले. त्यानंतर मनपा व पोलिस प्रशासनाने गुप्तपणे या मोहिमेचे नियोजन केले. फक्त मोहिमेत सहभागी करुन घेतल्या जाणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाच याची माहिती देण्यात आली. निश्चित केलेल्या प्लॅनप्रमाणे मनपा व पोलिस प्रशासनाचा जवळपास दीडशे ते दोनशे कर्मचारी अधिकारी दहा ते बारा वाहनांच्या ताफ्यासह दोन्ही बाजूने संबंधित भागात भल्या पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान शिरले. मात्र जेथे दिवसरात्र अवैध कत्तलखाने सुरु असतात. त्याठिकाणी प्रचंड शांतता होती. अवैध कत्तलखाने चालविणाऱ्यापैकी कुणीही तेथे उपस्थित नव्हते. हत्यारेही नव्हती. होती फक्त आपल्या कत्तलीची वाट पाहत बांधलेली - कोंबलेली मुकी जनावरे. मनपा व पोलिस अधिकाऱ्यांनी सदर परिसर पिंजून काढला परंतु त्यांना ना अवैध कत्तल करणारे सापडले ना त्यांची हत्यारे. प्रचंड गुप्तता पाळूनही आपल्या मोहिमेची बातमी फुटलीच कशी या अविर्भावात मोहिमेतील सहभागी अधिकारी - कर्मचारी एकमेकांकडे पाहत होती. तास दीडतासाच्या शोधाशोधनंतर सदर पथक परतले व पुन्हा दीडतासाने त्याच जागी परतले. मात्र परिस्थिती जैसे थे होती. त्यामुळे बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कायदेशीर कारवाईचे मोठे नियोजन करुन गेलेल्या मनपा व पोलिसाच्या पथकास कारवाईविना रिकाम्या हाताने परतावे लागले. मनपा व पोलिस प्रशासनाकडून या ‘घरका भेदी’चा शोध घेतला जात असला तरी बेकायदेशीर कत्तलखाने मालकांचा तो ‘मित्र’ सापडणे अवघडच असल्याची शक्यता दोन्ही प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.