शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

वातावरणात कमालीचा बदल ; शीतलहरीने गारठले नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:26 IST

शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मागील आठवडाभरापासून शहरात शीतलहर कायम असल्याने नाशिककर गारठले आहेत. तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून, मंगळवारी (दि.२९) सकाळी पारा थेट ७ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.

नाशिक : शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मागील आठवडाभरापासून शहरात शीतलहर कायम असल्याने नाशिककर गारठले आहेत. तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून, मंगळवारी (दि.२९) सकाळी पारा थेट ७ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. काश्मीरच्या द्रास भागात उणे तिशीपार तापमान गेल्याने बर्फ गोठला आहे. मोठ्या प्रमाणात हिमालय व काश्मीरमध्ये हिमवृष्टी होत असल्याने शीतलहर कायम आहे. परिणामी उत्तर महाराष्टÑात वातावरण अधिकाधिक थंड झाले आहे. २०१८च्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये अधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. २५ जानेवारी २०१८ रोजी ७.२ इतके सर्वाधिक कमी किमान तापमान नोंदविले गेले होते. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ आणि २०१६ साली जानेवारीअखेर सर्वात कमी ५.५ अंशांपर्यंत पारा घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे. चालू वर्षी नव्या वर्षाचा पहिला दिवस थंडीने चांगलाच गाजविला. यादिवशी सर्वाधिक कमी ६.२ इतके किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभरानंतर पुन्हा पारा ६.९ अंशांपर्यंत खाली घसरला. यावर्षी थंडीचा कडाका अधिक असून, नाशिककर वाढत्या थंडीने हैराण झाले आहेत.शीतलहरीने गारठले नाशिककर(पान १ वरून)कारण डिसेंबर महिन्यात ५.२ अंशांपर्यंत तापमान घसरले होते. त्यामुळे नागरिक गारठले होते. जानेवारीच्या पंधरवड्यानंतर थंडीची लाट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती; मात्र मकरसंक्रांतीनंतरदेखील थंडीची लाट कायम टिकून आहे. सूर्याचे उत्तरायण सुरू असूनदेखील वातावरणात अद्याप उष्मा जाणवत नसल्यामुळे प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. मागील आठवडाभरापासून नाशिककर थंडीच्या तीव्रतेचा सामना करत आहे. उबदार कपड्यांच्या वापरावर भर देत कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिक करताना दिसून येत आहे.राज्यात या शहरांमध्ये नीचांकी तापमाननागपूर - ६.५मालेगाव - ६.८अकोला - ६.८नाशिक - ७.०अहमदनगर - ७.२गोंदिया - ७.२जळगाव - ७.४बुलढाणा - ७.६परभणी - ८.२पुणे - ८.७अमरावती - ९.४चंद्रपूर - ९.४बीड - ९.६ताशी सहा ते सात किमी वाºयाचा वेगशहरात वाहणाºया थंड वाºयाचा वेग सरासरी ताशी सहा ते सात किलोमीटर इतका हवामान खात्याने नोंदविला आहे. वारे वेगाने वाहू लागल्यामुळे किमान व कमाल तापमानात सातत्याने घसरण होत आहे. येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण