ेत्र्यंबक शहराची हद्दवाढ अधिकृतपणे राजपत्रात जाहीर
By Admin | Updated: May 7, 2014 21:22 IST2014-05-07T20:35:34+5:302014-05-07T21:22:43+5:30
र्यंबक शहराची हद्दवाढ अखेर तीन वर्षांनंतर अधिकृतरीत्या मंजूर झाली असून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने राजपत्रात त्र्यंबक पालिकेची हद्दवाढ जाहीर करण्यात आली आहे.

ेत्र्यंबक शहराची हद्दवाढ अधिकृतपणे राजपत्रात जाहीर
त्र्यंबक शहराची हद्दवाढ अखेर तीन वर्षांनंतर अधिकृतरीत्या मंजूर झाली असून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने राजपत्रात त्र्यंबक पालिकेची हद्दवाढ जाहीर करण्यात आली आहे. तब्बल ३९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हद्दवाढीला हिरवा कंदील मिळाला.
ऑक्टोबर २०११ मध्ये प्राथमिक अधिसूचना जाहीर करून हद्दवाढीबाबत हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. विशेष म्हणजे आलेली हरकत वजा केलेल्या सूचनांची दखल घेऊन तीन वर्षांनी हद्दवाढीची घोषणा करण्यात आली. तथापि, राजपत्रात अधिसूचनेद्वारे जाहीर होईपर्यंत अधिकृतपणे हद्दवाढ झाली, असे म्हणता येणार नव्हते. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हद्दवाढ १४ फेब्रुवारी २०१४ रोजी जाहीर करण्यात आली आणि सदरची प्रत पालिकेला नुकतीच प्राप्त झाली.
आता १.८९ चौ.कि.मी.वरून अधिक ११.५५ चौ. कि.अतिरिक्त क्षेत्र वाढून एकूण १२.४४ चौ. कि.मी. क्षेत्रवाढ शहराची झाली आहे. या हद्दवाढीत कुठल्याही गावांचा समावेश नसून केवळ शिवारातील सीमा घेऊन हद्दवाढ करण्यात आली आहे. यामध्ये नीलपर्वत बिल्वतीर्थ यासह पूर्वेकडील पेगलवाडी व अंजनेरीची शिव, पश्चिमेकडे सायगाव, तळेगाव दुमालाची शिव, उत्तरेकडे पिंपळद (त्र्यंबक), तळवाडे या गावांची शिव, तर दक्षिणेकडे मेटघर किल्ल्याची शिव व त्र्यंबक ग्रामीणचा समावेश आहे.
सन २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काही विकासकामांना जागा नव्हत्या त्यासाठी उपयोग होणार आहे. त्र्यंबक शहराची वाढती लोकसंख्या, शहरातील जागांना आलेले भाव पाहता जागांचाही प्रश्न सुटणार आहे आणि पालिका हद्दीत ज्या गावांच्या शिवारातील जागा आल्या आहेत त्यांचाही एन.ए.चा प्रश्न मिटणार आहे.
पालिकेतील विविध विकासकामांसाठी जागा अपूर्ण पडत होती. तोही प्रश्न आता सुटणार आहे. मात्र त्यासाठी तब्बल ३९ वर्षे पालिकेला वाट पाहावी लागली. याचे कारण म्हणजे मध्यंतरीच्या काळात अडगळीत पडलेला हद्दवाढीचा प्रस्ताव!
सन १९७५ मध्ये प्रथम प्रस्ताव मांडला गेला त्यावेळचे सूचक होते स. बा. देवरे, तर अनुमोदक होते शांताराम गाजरे त्यानंतर ११ वर्षांनंतर हद्दवाढीचा दुसरा प्रस्ताव मांडला तो तत्कालीन नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांच्या कार्यकाळात! सूचक होते प्रतिभाताई गायकवाड व सुरेश पाचोरकर, तर अनुमोदक होते उषाताई श्िंागणे व सुरेश पाडेकर. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष कैलास घुले यांच्या काळात सन १९९१-९२ च्या दरम्यान प्रस्ताव मंजूर करून पाठपुरावा केला गेला.
-----