कवितांमधून समाजमनाची व्यथा व्यक्त : डहाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:21 IST2018-06-25T00:21:08+5:302018-06-25T00:21:25+5:30
आधुनिक युगातील कवितांमधून माणसाच्या आणि समाजमनाच्या व्यथा व्यक्त होण्याची गरज आहे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला कवी संजय चौधरी यांच्या कवितांमधून येता, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

कवितांमधून समाजमनाची व्यथा व्यक्त : डहाके
नाशिक : आधुनिक युगातील कवितांमधून माणसाच्या आणि समाजमनाच्या व्यथा व्यक्त होण्याची गरज आहे. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला कवी संजय चौधरी यांच्या कवितांमधून येता, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.
कवी संजय चौधरी यांच्या ‘कविताच माझी कबर’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी डहाके बोलत होते. सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कवयित्री प्रभा गणोरकर, डॉ. रमेश पाटील,
शशिकांत गुळुमकर, कवी अरुण शेवते, सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनायकदादा पाटील होते.