शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश; मनसेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 20:37 IST

नाशिकच्या गुन्हे शाखेने मनसेच्या गुहागर तालुका सचिव राकेश सुर्वेच्या बांधल्या मुसक्या

नाशिक : 'बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा'  अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. एका वायरल ध्वनिफितीच्या आधारे नाशिक क्राईम ब्रँचच्या युनिट 1च्या पथकाने बनावट ई-पास विक्रीचा पर्दाफाश करत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील रहिवाशी असलेला संशयित राकेश सदानंद सुर्वे उर्फ कृष्णा (32) यास गुरुवारी (दि.27) बेड्या ठोकल्या. विशेष बाब म्हणजे हा सुर्वे मनसेचा गुहागर तालुका सचिव असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामुळे या कारवाईकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काय भूमिका असेल याबाबतही विविध चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

कोरोना संक्रमणामुळे आंतरजिल्हा तसेच राज्यात प्रवास करण्यावर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. स्थानिक पोलिस प्रशासनाकडून पास प्राप्त करून घेतल्यानंतरच प्रवासाला विविध अटी व शर्तीनुसार परवानगी दिली जाऊ लागली. याचा फायदा काही भामट्यांनी घेत बनावट ई-पास बनविण्याची युक्ती शोधून काढत हजारो ते लाखो रुपये कमविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ई- पासबाबतची ध्वनीफित व्हाट्सएपच्या माध्यमातून व्हायरल झाली, आणि पोलिसांसाठी हाच महत्वाचा धागा ठरला. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी याप्रकरणी येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा नोंदविला.

तंत्रिकविश्लेषणाच्या सहाय्याने नाशिकच्या क्राईमब्रँच युनिट-1च्या पथकाने ध्वनिफीतमधील आवाजाचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. त्यावरून तपासाचे धागेदोरे थेट रत्नागिरीच्या गुहागरपासून मुंबईच्या डोंबिवलीपर्यंत जाऊन पोहोचले. संशयित गुहागरला असल्याचे निष्पन्न होताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक बलराम पालकर, दिलीप मोंढे, विशाल देवरे यांचे पथक रवाना केले.

व्हाट्सअॅपवर व्हायरल ध्वनीफितमधील आवाज असलेल्या मोबाईलधारक संशयित मनसेचा गुहागर तालुका सचिव असलेल्या सुर्वे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत 15 प्रवाशांकडून लॉकडाऊन काळात मुंबई येथून रत्नागिरीला जाण्यासाठी प्रत्येकी 2 हजार रुपये घेत पोलिसांच्या नावाने बनावट ई-पास इतर ठिकाणांवरुन काढून  दिल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता ईपास काढण्यासाठी वापर करत असलेला टॅब, मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता  न्यायालयाने येत्या 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पालकर करीत आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे; सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची डरकाळी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; ठाकरे सरकारने घेतले ७ महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री ठाकरेंना डोंबिवलीत फेरफटका मारा म्हणणाऱ्या राजू पाटलांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNashikनाशिकPoliceपोलिसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार