भगूरला एका किराणा दुकानात पहाटे स्फोट; भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 09:54 IST2019-11-25T09:54:42+5:302019-11-25T09:54:54+5:30
येथील भगूर गावातील मुस्लीम गल्ली मधील एका किराणा दुकानात आज पहाटे अचानकपणे स्फोट होऊन आग लागली.

भगूरला एका किराणा दुकानात पहाटे स्फोट; भीषण आग
नाशिक : येथील भगूर गावातील मुस्लीम गल्ली मधील एका किराणा दुकानात आज पहाटे अचानकपणे स्फोट होऊन आग लागली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखल होऊन आग विझवली. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की दुकान असलेले जुने बांधकाम सगळे कोसळले. मातीच्या ढिगाऱ्याखाली रिक्षा दाबली गेली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भगुरला मिनार मस्जिदच्या खोलीत राहणारे आसिफ शेख यांचे किराणा दुकान होते. दुकानात रात्री तीन वाजता अचानक स्पोट होऊन आग लागली. बांधकामकोसळल्याने जोरदार आवाज झाला. स्फोट नेमका कसला होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत पुढील तपास पोलीस, अग्निशमन विभाग करत आहेत.