शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, आठ जण भाजले; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 13:53 IST

संजरीनगर : सिलेंडर बदलताना गळती होऊन घडली दुर्घटना

नाशिक : जुन्या नाशकातील वडाळानाका भागात असलेल्या संजरीनगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि.2) रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  

इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये राहणाऱ्या सैय्यद कुटुंबियांच्या घरी शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. घरातील सिलिंडर रिकामे झाल्याने दुसरे सिलेंडर बसवित असताना रेग्युलेटर लावण्याचा प्रयत्न केला असता सिलेंडरमधून गॅसची वेगाने गळती होऊ लागली यामुळे घरातील पुरुषांनी सिलेंडर पेटू नये म्हणून जवळच पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये फेकले. यावेळी सिलिंडरमधील गॅस अचानकपणे सर्व घरात पसरला आणि मोठा स्फोट झालाआणि फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाला. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरुन गेला.

आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तात्काळ घरातील महिला, मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढून एका लहान टेम्पोतून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. दोन बंबाच्या सहाय्याने सुदैवाने लवकर आग लवकर विझल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांकडून या दुर्घटनेच्या कारणांचा सुक्ष्म शोध घेतला जात आहे. यासाठी पोलिसांनी घटनास्थळी न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकालाही शनिवारी दुपारी  पाचारण केले होते. या फ्लॅटमधून 3 रिकामे सिलेंडरदेखील आढळून आले आहे. या दुर्घटनेची नोंद मुंबईनाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  भाजलेल्या जखमींची नावे अशी..... सय्यद नुसरत रहीम (२५), ६३% जळीतशोएब वलिऊल्ला अन्सारी(२८) ९० % जळीतमुस्कान वलिऊल्ला सय्यद (२५) ८५ % जळीत.नसरीन नुसरद  सय्यद  (२५), ९५ % जळीतसईदा शरफोद्दीन सय्यद( ४९), ९५ % जळीतआरीफ सलिम अत्तार  (५३) ०९ % जळीतसय्यद लियाकत रहीम ( ३२) २७ % जळीतरमजान वलिऊल्ला अन्सारी(२२), २७ % जळीत

टॅग्स :fireआगCylinderगॅस सिलेंडर