शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

सिंगल यूज प्लॅस्टिकची व्याख्या स्पष्ट करा ; व्यापारी वर्गातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 7:48 PM

सिंगल यूज प्लॅस्टिक याविषयी संकल्पना स्पष्ट नसल्याने पुन्हा एकदा प्लॅस्टिक बंदी संदर्भात प्लॅस्टिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सरकारने बंदीविषयीच्या तरतुदी विधानसभेत स्पष्ट केल्या असल्या तरी कायद्यात सिंगल यूज प्लॅस्टिकची स्पष्ट व्याख्या नसल्याने अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून व्यापारी उद्योजकांना विनाकारण त्रास होत असल्याचा आरोप व्यापारीवर्गातून होत असून, सिंगल यूज प्लॅस्टिकविषयी कायद्यातील संकल्पना स्पष्ट करण्याची मागणी व्यापारीवर्गाकडून होत आहे.

ठळक मुद्देसिंगल युज प्लास्टिकची संकल्पना स्पष्ट करा उद्योजक, व्यापारी वर्गातून मागणी ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये सिंगल युज प्लास्टिक विषयी संभ्रम

नाशिक: प्लॅस्टिक बंदी कायद्यात एकदाच वापराच्या (सिंगल यूज) प्लॅस्टिक याविषयी संकल्पना स्पष्ट नसल्याने पुन्हा एकदा प्लॅस्टिक बंदी संदर्भात प्लॅस्टिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सरकारने बंदीविषयीच्या तरतुदी विधानसभेत स्पष्ट केल्या असल्या तरी कायद्यात सिंगल यूज प्लॅस्टिकची स्पष्ट व्याख्या नसल्याने अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून व्यापारी उद्योजकांना विनाकारण त्रास होत असल्याचा आरोप व्यापारीवर्गातून होत असून, सिंगल यूज प्लॅस्टिकविषयी कायद्यातील संकल्पना स्पष्ट करण्याची मागणी व्यापारीवर्गाकडून होत आहे.महाराष्ट्राच्या ६०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एकदाच वापरता येण्याजोग्य (सिंगल यूज) प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा मानस असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.२८) विधान परिषदेत स्पष्ट करतानाच राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग प्लॅस्टिकमुक्त बनविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सरकारने प्लॅॅस्टिकबंदी केली असली तरी यात लोक सहभाग महत्त्वाचा असून, प्लॅस्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता एकल वापराच्या प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळविण्याच्या चळवळीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभागी होणे अपेक्षित आहे. परंतु, सर्वसामान्य ग्राहकांसह प्लॅस्टिक व्यापारी व उद्योजकांमध्येही सिंगल यूज प्लॅस्टिकविषयी संभ्रम असून, कायद्यात स्पष्ट व्याख्यान नसल्याने अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून व्यापारी उद्योजकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे सरकारने १८ जून २०१८ रोजी केलेल्या प्लॅस्टिक बंदीनंतर समोर आले होते. त्यामुळे व्यापारीवर्गातून सिंगल यूज प्लॅस्टिकची व्याख्या स्पष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पर्याय नसलेल्या प्लॅस्टिकला सवलतमहाराष्ट्रात २३ जून २०१८ रोजी प्लॅस्टिक व थर्माकॉल बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र, बंदी असतानाही त्याची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण बंदीनंतरही प्लॅस्टिकला योग्य पर्याय उपलब्ध करून देण्यात यश आले नाही. परंतु, सरकारे पुन्हा एकदा बंदीचा प्लॅस्टिक बंदीचा फास आवळण्याची तयारी केली असून, त्यानुसार हॅण्डल असलेल्या कोणत्याही मायक्रॉनच्या प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिक अथवा थर्माकॉलच्या ताट, वाटी, चमच्या, स्ट्रॉ, कप बंद करण्यात आले आहेत, मात्र प्लॅस्टिक खुर्च्या, इंडस्ट्रियल पॅकेजिंगसह अन्य पर्याय उपलब्ध नसलेल्या प्लॅस्टिकवर बंदी नसल्याचे सरकाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNashikनाशिकbusinessव्यवसायAditya Thackreyआदित्य ठाकरे