मुदतबाह्य न्यूडल्स, पॉपकॉर्नचे पॅकेट रस्त्यावर, गरिबांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:34 IST2018-09-06T12:33:55+5:302018-09-06T12:34:18+5:30
पंचवटी अमरधाम येथून तपोवनात जाणाऱ्या रस्त्यावर ट्रकभर खाद्य पदार्थांचे पॅकेटस रस्त्यावर टाकण्यात आली

मुदतबाह्य न्यूडल्स, पॉपकॉर्नचे पॅकेट रस्त्यावर, गरिबांचे आरोग्य धोक्यात
ठळक मुद्देपंचवटी अमरधाम येथून तपोवनात जाणाऱ्या रस्त्यावर ट्रकभर खाद्य पदार्थांचे पॅकेटस रस्त्यावर टाकण्यात आली
नाशिक-मुदत संपलेल्या न्यूडल्स, पॉपकॉर्न, चाट आदि खाद्य पदार्थांचा ट्रकच अज्ञात व्यक्तीने पंचवटी अमरधाम येथील रस्त्यावर टाकून पोबारा केला आहे. परिसरातील गोरगरिब, भिकारी मुले हे पदार्थ गोळा करुन खात असून त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पंचवटी अमरधाम येथून तपोवनात जाणाऱ्या रस्त्यावर ट्रकभर खाद्य पदार्थांचे पॅकेटस रस्त्यावर टाकण्यात आली आहेत. यात चिवडा, वेफर्स, न्यूडल्स, पॉपकॉर्न आदि शेकडो पॅकेटस आहेत. या अन्नपदार्थांच्या पॅकेटची मुदत २०१७ मध्येच संपलेली आहे. याप्रकरणी संबंधीतांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.