वारकऱ्यांना दर्शनाची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:49 PM2020-01-18T22:49:40+5:302020-01-19T01:10:14+5:30

येत्या सोमवारी (दि. २०) होणाºया संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरी विसावल्या असून, अनेक दिंड्या दाखल होत आहेत. हजारो भाविक वारकºयांकडून होणाºया माउलीचा जयघोष ब्रह्मगिरीच्या कडे-कपाºयांत घुमत आहे. भगव्या रंगांच्या पताका आणि ध्वजांनी त्र्यंबकनगरी न्हाऊन निघाली असून, कुशावर्तावरही तुडुंब गर्दी होत आहे.

Expect to meet Warkari! | वारकऱ्यांना दर्शनाची आस!

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेसाठी राज्यभरातून दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे जात आहेत. शनिवारी नाशिक शहरातून त्र्यंबककडे टाळ-मृदंगाच्या जयघोषात निघालेली दिंडी. वारकऱ्यांची पाऊले आता त्र्यंबकच्या दिशेने झेपावू लागली आहेत.

Next
ठळक मुद्देश्रीसंत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव । शेकडो दिंड्या त्र्यंबकनगरीत दाखल

त्र्यंबकेश्वर : येत्या सोमवारी (दि. २०) होणाºया संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरी विसावल्या असून, अनेक दिंड्या दाखल होत आहेत. हजारो भाविक वारकºयांकडून होणाºया माउलीचा जयघोष ब्रह्मगिरीच्या कडे-कपाºयांत घुमत आहे. भगव्या रंगांच्या पताका आणि ध्वजांनी त्र्यंबकनगरी न्हाऊन निघाली असून, कुशावर्तावरही तुडुंब गर्दी होत आहे.
यात्रोत्सवासाठी नगर परिषदेसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवृत्तिनाथ समाधी मंदिर संस्थानतर्फे देखील दर्शन बारीची सुविधा करण्यात आली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची शासकीय महापूजा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता करण्याऐवजी एकादशीच्या दिवशी (दि. २०) सकाळी ९ वाजता होणार आहे. शनिवारी (दि. १८) नवमीलाच श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर वारकºयांच्या गर्दीने गजबजले असून, रविवारी दशमीला (दि. १९) रोजी त्र्यंबकेश्वरला येणाºया सर्व दिंड्या सायंकाळपर्यंत दाखल होणार आहेत. मुख्य दिवस पौष वद्य एकादशी (दि. २०) असल्याने यावर्षी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला येतील, असा अंदाज आहे. पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराचा जीर्णोद्धार वेगात होत असून, संजीवन समाधीचे दर्शन करणे सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी दिली आहे. श्रीक्षेत्र कसबे सुकेणे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे शुक्रवारी श्रीराम मंदिरापासून प्रस्थान झाले. संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी प्रस्थान झालेल्या या दिंडी सोहळ्यात कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, भाऊसाहेबनगर, थेरगाव व महिला-पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. दिंडीचा पहिला मुक्काम तपोवन, नाशिक, दुसरा मुक्काम महिरावणी व त्र्यंबकेश्वर नगरीत प्रवेश करून टाळ-मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा करणार आहे.

जय बाबाजी परिवारातर्फे दिंडी
ओझर टाउनशिप : जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने याही वर्षी श्रीक्षेत्र वेरूळ ते त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वेरूळ येथून प्रारंभ झालेली दिंडी आठ तालुक्यातून सत्संग करत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार आहे. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र वेरूळ ते त्र्यंबकेश्वर असा दिंडी सोहळा सुरू
केला.

Web Title: Expect to meet Warkari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.