Exercise can control diabetes: Sachin Arasule | व्यायामातून मधुमेहावर नियंत्रण शक्य : सचिन अरसुळे
व्यायामातून मधुमेहावर नियंत्रण शक्य : सचिन अरसुळे

नाशिक : जीवनशैलीतील झपाट्याने होणारा बदल अयोग्य आणि अतिरिक्त आहारामुळे लठ्ठपणा वाढून मधुमेह होतो. परंतु, आहाराचे नियोजन व व्यायाम केल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मधुमेहामुळे पायावर होणारे दुष्परिणाम टाळण्याठी नियमित चालणे आणि हातापायाचा व्यायाम करणे आवश्यक असल्याचे मत मधुमेह तज्ज्ञ डॉ. सचिन अरसुळे यांनी व्यक्त केले. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्य वाढविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
गोदाकाठावरील यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावर वसंत व्याख्यानमालेचे डॉ. दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९ पुष्प गुंफताना त्यांनी मधुमेहाचे पायावरील दुष्परिणाम व ते टाळण्यासाठी घ्यावयाची घबरदारी याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. डॉ. सचिन अरसुळे यांनी म्हणाले, भारतीय नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्यामुळे नाशिकसह देशभरात मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे, सध्या भारतात प्रत्येक सातव्या नागरिकाला मधुमेहाने ग्रासले असून, दर सातव्या सेकंदाला एका मधुमेहीचा वेगवेळ्या कारणांनी मृत्यू होते. यातही मधुमेह पूर्व अवस्थेत असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, २०२५ पर्यंत देशात प्रत्येक तिसरा व्यक्ती हा पूर्वमधुमेह बाधित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मधुमेह आजारांचा समूह आहे. शरीरातील साखर वाढल्याने मधुमेहाचा त्रास सुरू होतो. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायामामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाळासाहेब आहेर, प्रा. सी. डी. सावकार, हिरालाल परदेशी, मधुकर झेंडे, पारस बाफना, सरला बाफना आदी उपस्थित होते.
आजचे व्याख्यान
वक्ते : गिरीश टकले
विषय : रामशेजचा लढा


Web Title: Exercise can control diabetes: Sachin Arasule
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.