मालेगाव तालुका टीडीएफची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:41 IST2018-08-18T18:41:00+5:302018-08-18T18:41:38+5:30

मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच अनिल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

Executive Committee of Malegaon Taluka TDF | मालेगाव तालुका टीडीएफची कार्यकारिणी जाहीर

मालेगाव तालुका टीडीएफची कार्यकारिणी जाहीर

मालेगाव : मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच अनिल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यात मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ)च्या अध्यक्षपदी अनिल अहिरे, कार्याध्यक्षपदी मनोहर देसाई, कार्यवाह जयेश सावंत, उपाध्यक्ष सुधीर देसाई, भरत काकड, संदीप सूर्यवंशी, सचिन देशमुख, सहकार्यवाह टी. आर. सुर्वे, खजिनदार आर. पी. निकम, जिल्हा प्रतिनिधी नारायण चौधरी, हंसराज देसाई, आशिष पवार, विलास पाटील, के. डी. चंदन, संजय वाघ आदिंचा समावेश आहे.
मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षकाच्या अध्यक्षपदी जयेश खैरनार, कार्याध्यक्ष जे. जे. निकम, कार्यवाह एन. के. बोरसे, उपाध्यक्ष बी. बी. निकम, एस. पी. खैरनार, हरिष निकम, सहकार्यवाह प्रदिप अहिरे, बी. एस. महाजन, खजिनदार एन. एस. ठाकरे, जिल्हा प्रतिनिधी आर. डी. निकम, सुभाष शिंदे, विलास पाटील, साहेबराव देवरे आदिंचा समावेश आहे.

Web Title: Executive Committee of Malegaon Taluka TDF