बिलोली अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 15:56 IST2020-12-17T15:55:47+5:302020-12-17T15:56:38+5:30
सिन्नर : नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील मतिमंद मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला असून सदर घटनेतील आरोपींना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

बिलोली अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या
ठळक मुद्देसिन्नर: क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनची मागणी
सदर घटनेचा क्रांतिगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने निषेध करण्यात आलेला असून ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे समाजामध्ये अत्यंत संतापाचे वातावरण असून आरोपींना कठोर शासन व्हावे अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष विजय दोडके, नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश जाधव, उपाध्यक्ष राजुभाऊ वेळकर, शहराध्यक्ष काळूराम देडे, संजय दोडके, नितीन सरोदे, नितीन अहिरे, विजय खंडागळे, बॉबी मरसाळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.