भगूर-नानेगाव रस्त्यावर गोठ्यातील मलमूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:39 IST2018-09-22T00:39:21+5:302018-09-22T00:39:48+5:30
भगूर-नानेगाव रस्त्यावर रेणुकानगरजवळील गोठ्याचे मलमूत्र रस्त्यावर वाहात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. छावणी प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भगूर-नानेगाव रस्त्यावर गोठ्यातील मलमूत्र
देवळाली कॅम्प : भगूर-नानेगाव रस्त्यावर रेणुकानगरजवळील गोठ्याचे मलमूत्र रस्त्यावर वाहात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. छावणी प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रेणुकानगर येथील गोठ्याचे मलमूत्र, शेण रस्त्याच्या कडेने वाहत असते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्या घाणीतूनच पादचाऱ्यांना कसातरी मार्ग काढावा लागतो. सदर सांडपाणी थेट दारणा नदी पात्रात जाऊन मिसळत असल्याने नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नानेगाव ग्रामपंचायतीकडून छावणी परिषदेला अनेकवेळा लेखी तक्रार करण्यात आली आहे. तरीदेखील छावणी परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष केले जात आहे. छावणी परिषदेच्या मुख्याधिकाºयांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी अशोक आडके, विलास आडके, काळू आडके, केशव गोसावी, साईनाथ आडके, मोहन आडके, प्रकाश आडके, ज्ञानेश्वर काळे, राजू शिंदे, शरद रोकडे आदींनी केली आहे.