‘आप’चा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:14 AM2020-02-12T01:14:14+5:302020-02-12T01:14:48+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केल्याने मंगळवारी (दि.११) नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, आता लक्ष्य नाशिक महापालिका असा निर्धार व्यक्त केला आहे. पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ अशा प्रकारच्या घोषणादेखील यावेळी देण्यात आल्या आहेत.

The excitement of 'you' | ‘आप’चा जल्लोष

दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार पुन्हा आल्याबद्दल जल्लोष करताना जितेंद्र भाभे, नितीन शुक्ल, जगजित सिंग, गिरीश उगले, एकनाथ सावळे, कुलदीप कौर, सुमित शर्मा, शुभम पडवळ, अनिल रोकडे, पद्माकर आहिरे, संतोष राऊत

Next

नाशिक : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केल्याने मंगळवारी (दि.११) नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, आता लक्ष्य नाशिक महापालिका असा निर्धार व्यक्त केला आहे. पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ अशा प्रकारच्या घोषणादेखील यावेळी देण्यात आल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला धूळ चारून आम आदमी पार्टीने बाजी मारली त्यानिमित्ताने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आणि सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जल्लोष केला. या जल्लोषात जितेंद्र भाभे, नितीन शुक्ल, जगजित सिंग, गिरीश उगले, एकनाथ सावळे, कुलदीप कौर, सुमित शर्मा, शुभम पडवळ, संतोष राऊत यांच्यासह अन्य कार्यकर्तेे सहभागी झाले होते.





 

Web Title: The excitement of 'you'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.