कर्मवीर भाऊराव पाटील जयंती जानोरी विद्यालयात उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 16:01 IST2020-09-22T16:00:04+5:302020-09-22T16:01:12+5:30
जानोरी ; दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती जानोरी विद्यालयात उत्साहात
जानोरी ; दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार आदी उपस्थित होते. तहसीलदार पंकज पवार यांनी कर्मवीर अण्णा यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली त्याचप्रमाणे कॉवीड -१९ विषयी माहिती दिली. स्कूल कमिटीचे चेअरमन शंकर काठे , व्हाईस चेअरमन सोपान राहणे, उपसरपंच गणेश तिडके, पोलीस पाटील, सुरेश घुमरे. ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ. अशोक केंग, संदीप गुंजाळ, समाधान पाटील, निवृत्ती घुमरे, योगेश तिडके, सुभाष नेहरे आदी उपस्थित होते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.