विदेशी दांपत्य आल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:20 IST2020-03-26T23:19:28+5:302020-03-26T23:20:19+5:30
वर्षभरापासून विविध राज्यांचा अभ्यास दौरा करत इंदूर येथून नाशिकरोडच्या उपनगर येथील मातोश्रीनगरमध्ये विदेशी जर्मन दांपत्य आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मनपा व पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व चौकशी करून त्यांची मुंबईला रवानगी केली.

विदेशी दांपत्य आल्याने खळबळ
नाशिकरोड : वर्षभरापासून विविध राज्यांचा अभ्यास दौरा करत इंदूर येथून नाशिकरोडच्या उपनगर येथील मातोश्रीनगरमध्ये विदेशी जर्मन दांपत्य आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मनपा व पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व चौकशी करून त्यांची मुंबईला रवानगी केली.
जर्मन दूतावासाने जर्मनीचे एक नागरिक व त्यांच्या पत्नीला भारताचा सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक अभ्यासासाठी पाठवले आहे. भारतात कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे संबंधित दांपत्याने जर्मन प्रशासनाला कळवले. जर्मन प्रशासनाने त्यांची मुंबईवरून जर्मनीला येण्याची सोय केली. त्या दांपत्याला त्यांच्या मित्राने नाशिकमार्गे यावे, मग मुंबईला जाता येईल, असे सांगितले. त्यानुसार हे दांपत्य हे बुधवारी (दि. २५) रात्री उपनगर येथील मातोश्रीनगरमध्ये आपल्या मोटारीने आले. सकाळी रहिवाशांनी त्यांना पाहिल्यावर खळबळ उडाली. नगरसेविका सुषमा पगारे व युगांतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी पगारे यांना संबंधितांची माहिती मिळतात त्यांनी तत्काळ मनपा व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दांपत्याची चौकशी केली.