महानुभाव पंथीयांची समाजप्रबोधन यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:03 IST2019-11-13T23:42:43+5:302019-11-14T00:03:38+5:30

महानुभाव पंथाचे आचार-विचार जनसामान्यांना कळावेत व त्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने महानुभव पंथीयांच्या समाजप्रबोधन यात्रेचे निफाड तालुक्यातील सुकेणे येथून प्रस्थान झाले आहे.

 Excellency The journey of the patriarchs | महानुभाव पंथीयांची समाजप्रबोधन यात्रा

महानुभाव पंथीयांची समाजप्रबोधन यात्रा

कसबे-सुकेणे : महानुभाव पंथाचे आचार-विचार जनसामान्यांना कळावेत व त्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने महानुभव पंथीयांच्या समाजप्रबोधन यात्रेचे निफाड तालुक्यातील सुकेणे येथून प्रस्थान झाले आहे. पंधरा दिवसांच्या पायी प्रवासाने आणि ८१ ठिकाणांवरील भेटीने या यात्रेचा समारोप मराठवाड्यातील जाळीचा देव येथे होणार आहे.
नाशिक जिल्हा महानुभाव समिती आणि श्री दत्त मंदिर मौजे सुकेणे येथील संत, भाविक यांच्या वतीने आयोजित भगवान श्री चक्र धर स्वामी चरणांकित स्थान, वंदन आणि समाजप्रबोधन पदयात्रेचे प्रस्थान गोपीराजशास्त्री सुकेणेकर, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
मराठवाड्यातील विविध मठ, मंदिरांचे संत यात सहभागी होणार आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यातील गेवराईमधील बाग पिंपळगाव ते वनदेव (जालना) यादरम्यान असलेले एकूण ४३ चरणांकित स्थानावर या पायी दिंडीने भेटी देत प्रबोधन केले होते.
यंदा गेवराई तालुक्यापासून ते जाळीचादेव या दरम्यान ८१ स्थानांवर भेटी देणार असून २७० किलोमीटर प्रवास करून १५ दिवसांचा कालावधी या पायी दिंडीला लागणार आहे, अशी माहिती गोपीराजशाश्री सुकेणेकर, प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी यावेळी दिली.
पदयात्रा सत्य, अहिंसा, शांती, समता, राष्ट्रीय एकात्मता, प्रदूषण, जलसिंचन व चक्र धर स्वामींचा विचार व साहित्य यांचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. महानुभाव संत, महंत आणि भाविक चक्र धर स्वामी यांच्या चरणांकित स्थानांनाही भेटी देणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक भाविक यात सहभागी आहेत.
- गोपीराजशास्त्री सुकेणेकर, सुकेणे

Web Title:  Excellency The journey of the patriarchs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.