माजी सैनिकाकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:04 IST2019-02-17T23:56:18+5:302019-02-18T00:04:38+5:30

खामखेडा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुलीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परिसरातील आजी- माजी सैनिक व खामखेडा ग्रामस्थांच्या वतीने शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Ex-serviceman commemorates martyr jawans | माजी सैनिकाकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

खामखेडा येथे माजी सैनिकांकडून हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना.

ठळक मुद्देजर गरज पडल्यास आम्ही अजूनही सीमेवर जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यास तयार

खामखेडा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा तालुक्यातील खामखेडा चौफुलीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परिसरातील आजी- माजी सैनिक व खामखेडा ग्रामस्थांच्या वतीने शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जर गरज पडल्यास आम्ही अजूनही सीमेवर जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यास तयार आहोत अशी भावना माजी सैनिकांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी माजी सैनिक जयराम शेवाळे, कारभारी शेवाळे, शांताराम पवार, रशीद शेख, रघुनाथ पगार, हिरामण देवरे, प्रल्हाद पवार, वारकरी, शेतकरी, कष्टकरी परिवार मंडळाचे अध्यक्ष सुभाष बिरारी, अण्णा पाटील, उपसरपंच बापू शेवाळे, संजय मोरे, सुनील शेवाळे, पांडू मोरे, आदींसह परिसरातील ग्रामस्थ आणि महिला वर्गदेखील उपस्थित होत्या.

Web Title: Ex-serviceman commemorates martyr jawans

टॅग्स :Indiaभारत