शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

रोजच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिके पाण्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:26 AM

नाशिक तालुका पूर्व भागात गेल्या आठवडाभरापासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ढग फुटीसारख्या या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचल्याने भाजीपाला पिके सडू लागली आहेत.

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागात गेल्या आठवडाभरापासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ढग फुटीसारख्या या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचल्याने भाजीपाला पिके सडू लागली आहेत. मेथी, शेपू, पालक पिवळी पडून सडू लागली आहेत. त्यामुळे ऐन पितृ पक्षात भाजीपाल्याचे भाव गगणाला भिडले आहेत.नाशिक तालुका पूर्व भागातील काही ठिकाणी टमाट्याची खुडणी सुरू आहे. चिखलातून व पाणी साचलेल्या सऱ्यांमधून मजूर टमाटे खुडून त्याच्या प्रतवारीनुसार विभागणी करीत आहेत. मजुरांना १६ रु पये जाळीप्रमाणे टमाटे खुडण्याची मजुरी दिली जात आहे. पावसामुळे टमाट्याचे भाव उतरले असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे २०० रु पये जाळी प्रमाणे भाव मिळतो. यापूर्वी गेल्या आठवड्यात सुमारे ४०० रु पये जाळीचा भाव मिळत होता. मात्र संततधार पावसामुळे टमाट्याचे दर कमी झाल्याचे सामनगावचे शेतकरी तानाजी ढोकणे सांगतात.काही ठिकाणी फ्लॉवरची निंदणी शेतकरी सहकुटुंब करीत आहेत. सध्या सुरू असलेली पावसाची रिपरिप व मजुरांची वानवा असल्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरीच सर्व कामे उरकावी लागत आहेत. एकलहरे गाव, हिंगणवेढे परिसरात द्राक्षबागांची आॅक्टोबर छाटणीला सुरु वात झाली आहे.सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, हिंगणवेढे परिसरात पावसाचे पाणी शेतातून उफाळून आल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली आहेत ही पिके चिखल व पाण्यामुळे सडून जाण्याची भीती हिंगणवेढ्याचे शेतकरी साहेबराव धात्रक यांनी व्यक्त केली आहे.जाखोरी, मोहगाव, चांदगिरी, कोटमगाव शिवारात मूग व भुईमूग ही पिके जोमात आहेत. अनेक ठिकाणी शेतकºयांनी काकडीची लागवड केली आहे. औषधे फवारणी करून पिकांवरील किडीचे नियंत्रण शेतकरी करीत आहेत. काकडीला पिवळ्याधमक फुलांचा बहर आला आहे. आणखी पंधरा दिवसांनी लुसलुसीत काकडी खुडायला येईल, असे जाखोरीचे शेतकरी भाऊसाहेब कळमकर यांनी सांगितले.भरपूर पावसामुळे उसाचे पीक व द्राक्षाच्या बागा जोमाने बहरू लागल्याचे दिसते. एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चांदगिरी, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी, या परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने नद्या, नाले, विहिरी, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाला शेंगा आल्या आहेत. या शेंगातून दाणे भरण्याची प्रक्रि या सुरू आहे. सुमारे दीड महिन्यानंतर सोयाबीन पीक काढणीस येईल.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती