शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

एव्हरेस्ट सर करणा-या हिलीमची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 3:51 PM

वेळुंजे : एव्हरेस्ट शिखर सर करणा-या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील मनोहर हिलीम याची ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढत जंगी ...

ठळक मुद्दे मनोहर हिलीम याने माउंट एव्हरेस्ट शिखर मोहीम अंतर्गत मिशन शौर्यला गवसणी घातली होती

वेळुंजे : एव्हरेस्ट शिखर सर करणा-या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील मनोहर हिलीम याची ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढत जंगी सत्कार केला. यावेळी हिलीम याचा गौरव करत ग्रामस्थांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.जिद्द, चिकाटी, मेहनत,धैर्य आणि डोळ्यापुढे ध्येय ठेवून मनोहर हिलीम याने माउंट एव्हरेस्ट शिखर मोहीम अंतर्गत मिशन शौर्यला गवसणी घातली होती. त्याच्या जिद्दीला सलाम करत एव्हरेस्ट शिखर पार केल्याने खरवळ ग्रामपंचायती तर्फे तसेच ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून हिलीम याचे वाजत गाजत स्वागत आणि सत्कार केला.या सत्काराला उत्तर देतांना मनोहर हिलीम याने प्रत्यक्ष आलेले प्रसंग कथन केले. माझ्या अंगी जिद्द, चिकाटी आणि लहान -थोरांचे आशीर्वाद तसेच गुरु जनांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरल्याचे यावेळी त्याने सांगितले. यावेळी समाधान बोडके,विनायक माळेकर यांनी यांनीही त्याचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले.यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच मंदाताई मौळे, उपसरपंच गोकुळ गारे, समाधान बोडके, विनायक माळेकर, संजय मेढे, शरद मेढे, विठ्ठल मौळे, गोपाळ हिलीम, भागवत हिलीम, सुभाष चौधरी, देविदास हिलीम, चंदर शेवरे, हरी शेवरे, दत्तू मौळे, श्याम मौळे, चंदर गावित,परशराम मौळे,वाळू दिवे,शंकर गावित,अंबादास गायकवाड,किसन शेवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सार्थ अभिमानएव्हरेस्ट वीर मनोहर हिलीम याने खरवळ गावच्या नावासह तालुक्याचे,जिल्ह्याचे आणि राज्याचेही नाव मोठे केल्याने आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. इतरांनीही मनोहरचा आदर्श घ्यावा.- मंदा विठ्ठल मौळे, सरपंच,खरवळ ग्रामपंचायत

टॅग्स :NashikनाशिकEverestएव्हरेस्ट