जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 22:00 IST2025-10-22T22:00:03+5:302025-10-22T22:00:24+5:30
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत आमदार खोसकर बोलत होते.

जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर
प्रसाद जोशी/वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर - नाशिक त्र्यंबक रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यासाठी एन एम आर डी ए तर्फे बळजबरीने जमीन अधिग्रहण सुरू आहे. हा रस्ता इतका मोठा करण्याची गरज नसतानाही जमीन अधिग्रहण केले जात आहे. जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असले तरी एकही मंत्री या पिडितांचे अश्रू पोहोचण्यासाठी आला नाही, अशी खंत इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत आमदार खोसकर बोलत होते. आपण कायम मतदारसंघातील नागरिकांच्या पाठीशी उभे असल्याचा दिलासाही त्यांनी दिला. याप्रसंगी बोलताना श्री पंचायती आनंद आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरानंद सरस्वती यांनी सरकार कुंभमेळ्याच्या नावाखाली मनमानी करीत असल्याचा आरोप केला. साधू महंत आणि पुरोहित संघाला विश्वासात घेतले जात नसल्याचेही शंकरानंद सरस्वती म्हणाले.