दुर्गम तालुक्यांतही  मुलींचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:25 PM2020-07-29T22:25:13+5:302020-07-30T01:50:05+5:30

नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण यांसारख्या दुर्गम तालुक्यांतील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या प्रमाणात आघाडीवर राहिले असून, दहावीच्या यावर्षीच्या निकालातून जिल्ह्यातील दुर्गम भागातही मुलींचीच सरशी झाल्याचे अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यात उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील एकूण ८९ हजार ७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८४ हजार ५५८ म्हणजेच (९४.९३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९३.६१ टक्के मुले, तर ९६.४३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत

Even in remote talukas, girls are the best | दुर्गम तालुक्यांतही  मुलींचीच सरशी

दुर्गम तालुक्यांतही  मुलींचीच सरशी

Next
ठळक मुद्देदहावी परीक्षा निकाल : कळवण, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा टक्केवारीत पुढे; उत्तीर्णतेत मुलीच आघाडीवर


 

 

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण यांसारख्या दुर्गम तालुक्यांतील विद्यार्थीदहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या प्रमाणात आघाडीवर राहिले असून, दहावीच्या यावर्षीच्या निकालातून जिल्ह्यातील दुर्गम भागातही मुलींचीच सरशी झाल्याचे अधोरेखित झाले आहे.
जिल्ह्यात उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील एकूण ८९ हजार ७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८४ हजार ५५८ म्हणजेच (९४.९३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९३.६१ टक्के मुले, तर ९६.४३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ९६.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुरगाणा ९६.७३, कळवण ९६.१५, इगतपुरी ९४.३६ व पेठ तालुक्यातील ९२.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चांदवड ९५.५, दिंडोरी, ९५.१७, देवळा ९५.७४, मालेगाव ९२.२३, मालेगाव शहर ९१.४८, नाशिक ९३, नाशिक शहर ९७.१२, निफाड ९४.४०, नांदगाव ९५.६४, सटाणा ९३.९८, सिन्नर ९५.४६ व येवल्यातील ९४.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (विशेष पान २/३)

Web Title: Even in remote talukas, girls are the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.