सोमवारीदेखील केवळ युवांचेच लसीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:15 IST2021-05-10T04:15:01+5:302021-05-10T04:15:01+5:30
लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शनिवार प्रमाणेच सोमवारी देखील केवळ ५ केंद्रांवरच लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी देखील ...

सोमवारीदेखील केवळ युवांचेच लसीकरण !
लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शनिवार प्रमाणेच सोमवारी देखील केवळ ५ केंद्रांवरच लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी देखील केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. महिनाभर सतत चाललेल्या लसीकरणानंतर या रविवारी शासकीय सुटीमुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी पुन्हा लसीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे मनपातर्फे कळविण्यात आले आहे. शनिवार प्रमाणेच शहरातील पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय आणि मायको रुग्णालय, नाशिक रोडचे खोले मळा, सातपूरचे मायको दवाखाना तसेच सिडकोतील नागरी आरोग्य केंद्र या केवळ पाच केंद्रांवरच लसीकरण करण्यात येणार आहे. शहरातील साठपैकी ही केवळ पाच केंद्रेच सुरू राहणार असल्याने नागरिकांची निराशाच होणार आहे. हे लसीकरण देखील रविवारी नोंदणी केलेल्या युवा नागरिकांचेच होणार असल्याने ४५ वर्षावरील सर्व नागरिकांसह ज्येष्ठांना लसीकरणासाठी अजून एक-दोन दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे.