कांदा दरात वाढ उत्पादकांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:19 IST2020-08-19T21:05:01+5:302020-08-20T00:19:29+5:30
वणी : उपबाजारात कांद्याला बुधवारी २०६५ रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने उत्पादकांमधे उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यामधे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. सुमारे एक हजार ते अकराशे रु पयांच्या जवळपास दर मिळाल्याने उत्पादकांमधे नैराश्याचे वातावरण होते. मात्र बुधवारी चित्र बदलल्याने उत्पादकांना हायसे वाटले.

कांदा दरात वाढ उत्पादकांमध्ये उत्साह
लोकमत न्युज नेटवर्क

वणी उपबाजारात बुधवारी (दि.१९) २४० वाहनांमधुन ५००० क्विंटल कांद्याची आवक झाली. २०६५ रु पये कमाल, ११०० रु पये किमान तर १६७५ रु पये सरासरी प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर गोल्टी स्वरु पाच्या कांद्याला १६६५ कमाल ७०० किमान तर १३०० रु पये सरासरी असा प्रति क्विंटलचा दर मिळाला.
दक्षिण भागात प्रचंड पावसामुळे कांद्याचे सुमारे २५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढल्याची माहीती देण्यात आली. नाशिकच्या कांद्याला गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यांमधे मागणी वाढली आहे. तर आंध्र, कर्नाटक, तामिळनाडु या राज्यांमधेही तुलनात्मक मागणी वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याने दरात सुधारणा झाल्याची माहीती देण्यात आली.