बाजारात स्ट्रॉबेरी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 01:17 IST2020-12-28T01:16:41+5:302020-12-28T01:17:12+5:30

अंबटगोड चवीची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. यंदा पोषक हवामानामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले झाले असल्याने स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. 

Entering strawberries on the market | बाजारात स्ट्रॉबेरी दाखल

बाजारात स्ट्रॉबेरी दाखल

नाशिक : अंबटगोड चवीची लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. यंदा पोषक हवामानामुळे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न चांगले झाले असल्याने स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. 
गेल्या आठवड्यापासून नाशिकच्या पेठरोडवरील फ्रूट मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील आदिवासी भागात यंदा स्ट्रॉबेरीचे चांगले पीक 
आल्याने त्यांना थेट बाजारात चांगला भाव देखील मिळू लागला आहे. किरकोळ बाजारातही स्ट्रॉबेरी विक्रीसाठी उपलब्ध झाली असून ग्राहकांकडून मागणी होतांना दिसत आहे. 

Web Title: Entering strawberries on the market