शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाटावर आधी प्रबोधन, मग कारवाई

By admin | Updated: April 2, 2017 01:22 IST

नाशिक : महापालिकेने गोदावरी नदीपात्रासह गोदाघाटावरील प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहे,

 नाशिक : महापालिकेने गोदावरी नदीपात्रासह गोदाघाटावरील प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून, पहिले तीन दिवस गोदापात्रात घाण-कचरा टाकू नये, यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. त्यानंतर दि. ४ एप्रिलपासून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती गोदावरी कक्षाचे प्रमुख रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले.महापालिकेने गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खास गोदावरी कक्ष स्थापित केला आहे. गोदापात्रात घाण-कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दि. १ एप्रिलपासून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी घेतला आहे. त्यानुसार, महापालिकेने शनिवार (दि.१) पासून कार्यवाहीला सुरुवात केली. पहिले तीन दिवस गोदाघाटावर तसेच गोदापात्रात घाण-कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन केले जाणार असून, त्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत घाटावर ठिकठिकाणी माहिती-सूचना फलक उभारले जाणार आहेत. सुरुवातीला रामकुंड परिसराकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. रामकुंड परिसरात कपडे व वाहने धुण्यास मनाई करण्यात आलेली आहे, याशिवाय निर्माल्य टाकण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पहिले तीन दिवस प्रबोधनावर भर राहणार आहे. त्यानंतर दि. ४ एप्रिलपासून गोदाघाटावर तसेच नदीपात्रात घाण-कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रुपये तर परत तोच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास पाच हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. गोदावरी कक्षाचे प्रमुख रोहिदास दोरकुळकर यांनी पहिल्या दिवशी संबंधित खातेप्रमुखांसह रामकुंड परिसराचा आढावा घेतला. याठिकाणी महापालिकेचे सुमारे ५० कर्मचारी व सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)