शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माध्यमाला इंग्रजी प्रश्नपत्रिका

By admin | Updated: February 27, 2017 00:41 IST

नाशिक : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार रविवारी (दि.२६) उघडकीस आला.

नाशिक : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार रविवारी (दि.२६) उघडकीस आला. सेमी मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रश्नपत्रिका मिळाल्याने मुलांना प्रश्नपत्रिका अधिक दर्जेदारपणे सोडवता आली नाही. यामुळे पालकांनी पेठे विद्यालय या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकांना धारेवर धरले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत रविवारी शहरात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली; मात्र या परीक्षेदरम्यान दोन केंद्रांवर गोंधळ झाला. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गोरेराम लेनमधील अभिनव बालविकास मंदिर या शाळेतील प्राथमिक वर्गातील सुमारे शंभर विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रावर ‘सेमी इंग्रजी’ असा उल्लेख आला; मात्र सदर बाब संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला नाही. यामुळे या केंद्रावर काही विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रश्नपत्रिका मिळाल्या. विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी केली. मात्र त्यांना इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना भाषा विषयाचा पेपर सोडविता आला नसल्याने अनेकांना रडू कोसळले. साडेबारा वाजेच्या सुमारास भाषेचा पेपर संपला व मुले कें द्रातून बाहेर आली तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला. पालकांनी केंद्र संचालकांना जाब विचारला. दरम्यान, केंद्र संचालकांनी सदर प्रकार शिक्षण अधिकारी प्रवीण आहेर यांना कळविला. आहेर पेठे विद्यालयात दुपारी पोहचले असता पालकांसह विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालत घडलेला प्रकार कथन केला. (प्रतिनिधी)शैक्षणिक नुकसान; कारवाईची मागणीपेठे विद्यालय केंद्रासह वाघ गुरुजी केंद्रावरील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या पालकांनी शिक्षणाधिकारी प्रवीण अहेर यांना निवेदन दिले. पंधरा मिनिटे प्रश्नपत्रिका उशिरा देऊनही अखेरीस वेळ वाढवून न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडविता आली नसल्याचे  निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे पेठे विद्यालय  केंद्रावरील पालकांनीसुद्धा अहेर यांना निवेदन दिले  असून, मराठी माध्यमांच्या सुमारे ११० विद्यार्थ्यांना  इंग्रजी प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने पाल्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.