टीडीआर प्रकरणातील अभियंते रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:47 IST2018-07-07T00:47:07+5:302018-07-07T00:47:50+5:30
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागातील टीडीआर घोटाळा उघड झाल्यानंतर या प्रकरणात ठरवून महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचा आयुक्तांचा संशय असून, त्यामुळे संबंधित अभियंते आयुक्तांच्या रडारवर आहेत. टीडीआर प्रकरणात घोळ झाल्याची विशिष्ट प्रकरणे कोणीही निदर्शनास आणून दिल्यास त्यावर कारवाई करण्याची तयारी केल्याने संबंधित लॉबीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वॉक विथ कमिशनर या कार्यक्रमातील एका तक्रारीच्या आधारे आयुक्तांनी टीडीआरचा मोठा घोटाळा उघड केला आणि मोफत दिलेल्या जागेसाठी भरपाई मागण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर टीडीआरचे प्रमाणपत्र देण्याचे रोखले होते. मोफत जागा मिळूनही त्यांची नोंद सातबारावर न करणे, संबंधित रस्त्यासाठी जागा मिळूनही रस्ता रुंद न करणे, तसेच अगोदरची प्रकरणे न तपासताच टीडीआर देण्यासाठी खरेदी खत करणे हे सर्व षडयंत्र असल्याचे आयुक्तांचे म्हणणे असून, त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची छाननी केली
आहे. महापालिकेत यापूर्वीही टीडीआर घोटाळे गाजले आहेत. दोनदा
भरपाई घेणे, भूखंडावर अतिक्रमण असतानाही त्याचा मोबदला घेणे यांसह अन्य अनेक प्रकरणे घडली आहेत. भूसंपादनामध्येही मोठी साखळी असल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागातील सावळा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी या विभागातील जवळपास सर्वच अभियंते बदललेले आहेत. इतकेच नव्हे तर यापूर्वी कनिष्ठ अभियंत्याकडे शिवारनिहाय काम दिले जात होते, तेदेखील बंद केले आहे.