महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित

By Admin | Updated: August 7, 2014 02:04 IST2014-08-07T00:45:27+5:302014-08-07T02:04:07+5:30

महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित

The end of the revenue workers' suspension | महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित

महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित

 

नाशिक : महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघाल्याने गुरुवारपासून शासकीय कामकाज सुरू करण्यात येणार असून, त्याबाबत महसूल कर्मचारी संघटनेने पत्रक पाठवून जाहीर केले आहे.
गेल्या सहा दिवसांपासून महसूल कर्मचारी व दोन दिवसांपासून तहसीलदार व उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारीही या संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी या तिघांचीच हजेरी आहे. तालुका पातळीवरील तहसील व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना कुलुपे ठोकण्यात आल्याने कामकाज ठप्प झाले होते. बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री सुरेश धस, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या.
त्यात प्रामुख्याने नायब तहसीलदारांचे ग्रेड पे वाढविण्यात आला. महसूल लिपिकांचे पदनाम बदलून ते सहायक करण्यात आले. कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना अंतिम अधिकार देण्यात आले. शिपायांना सायकलऐवजी मोटारसायकल अग्रीम मान्य करण्यात आला. त्यामुळे संप स्थगित करण्यात आला असून, गुरुवारी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विजयी द्वारसभा घेण्यात येणार आहे.

Web Title: The end of the revenue workers' suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.