रासेयो श्रम शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:29 PM2020-01-09T23:29:47+5:302020-01-09T23:30:14+5:30

रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंबासन येथे सुरू असलेल्या रासेयो श्रम शिबिराचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वनील कोळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. भामरे होते. प्राचार्य डॉ. अरु ण येवले, अंबासनचे सरपंच जितेंद्र अहिरे उपस्थित होते.

The end of the Rasayo labor camp | रासेयो श्रम शिबिराचा समारोप

अंबासनला रासेयो श्रमशिबिरात स्वयंसेवक सुनील ठाकरे, राहुल माळी, युवराज गांगुर्डे, मयूर रौंदळ, कृष्णा गेंद, सागर मोरे, योगेश ठाकरे, तुषार गायकवाड, एकता परदेशी, मोहिनी मार्तण्ड, शिंदे समृद्धी, निकिता रिपोटे, पूनम वडक्ते, स्नेहल मोरे, वृषाली खैरनार, अलविका गायकवाड, कविता चव्हाण आदी.

Next
ठळक मुद्देकुकाणे : रावळगाव कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय

कुकाणे : रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंबासन येथे सुरू असलेल्या रासेयो श्रम शिबिराचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वनील कोळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. भामरे होते. प्राचार्य डॉ. अरु ण येवले, अंबासनचे सरपंच जितेंद्र अहिरे उपस्थित होते.
शिबिरात स्वयंसेवकांकडून रस्त्यातील खड्डे बुजविण्यात आले. स्वच्छतेचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले. खंडेराव महाराज मंदिर व डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. व्यसनाधिनता व आजच तरुण या विषयावर प्रबोधनात्मक नाटिका सादर करून जन-जागृती करण्यात आली. एच.एन. काथेपुरी, सुधाकर पवार, डॉ. हर्षल भामरे, डॉ. श्वेता एस. अहिरे, डॉ. व्ही.आर. निकम, डॉ. एस.टी. शेलार, श्रीमती शुभांगी बेळगावकर, प्रा. आर. पी. ठाकरे, डॉ. बी. एम. सोनवणे प्रशांत बैरागी यांची व्याख्याने झाली.
कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे यांच्यासह स्वयंसेवक विद्यार्थी सुनील ठाकरे, राहुल माळी, युवराज गांगुर्डे, मयूर रौंदळ, कृष्णा गेंद, सागर मोरे, योगेश ठाकरे, विशाल दुबे, राकेश शिरोळे, तुषार गायकवाड, एकता परदेशी, मोहिनी मार्तंड, शिंदे समृद्धी, निकिता रिपोटे, पूनम वडक्ते, स्नेहल मोरे, वृषाली खैरनार, अलविका गायकवाड, दीपाली रौंदळ, गीतांजली बिरारी, कविता चव्हाण श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झाले.

Web Title: The end of the Rasayo labor camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.