नैराश्यातून वर्षभरात २७६ जणांकडून आयुष्याचा शेवट
By विजय मोरे | Updated: January 12, 2019 00:25 IST2019-01-12T00:23:53+5:302019-01-12T00:25:54+5:30
नाशिक : आर्थिक प्रश्न, कौटुंबिक तंटे, नोकरी- व्यवसायातील ताणतणाव, शारीरिक व्याधी व क्षणभराचा संताप या प्रमुख कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत ...

नैराश्यातून वर्षभरात २७६ जणांकडून आयुष्याचा शेवट
नाशिक : आर्थिक प्रश्न, कौटुंबिक तंटे, नोकरी- व्यवसायातील ताणतणाव, शारीरिक व्याधी व क्षणभराचा संताप या प्रमुख कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शहरातील २७६ नागरिकांनी जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षात आत्महत्येचा मार्ग पत्करून जीवन संपविल्याचे वास्तव समोर आले आहे़ विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १८५ पुरुष तर ९२ स्त्रियांचा समावेश आहे़ नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़
शहरातील प्रत्येक नागरिकाच्या भौतिक सुख-सुविधांबाबत अपेक्षा वाढलेल्या आहेत़ तर दुसरीकडे नोकरी, व्यवसाय वा उद्योग करताना बहुतांशी सर्वसामान्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो़ याचा परिणाम कौटुंबिक जीवन, नातेसंबंध व स्वास्थ्यावर होतो़ नोकरी, व्यवसायात अहोरात्र मेहनत घेऊनही अपेक्षापूर्ती न झाल्यास नैराश्येत सापडून आत्महत्येचा मार्ग जवळ करीत आहेत़ गळफास, विषारी औषध, विहिरी, नदीच्या पात्रात उडी, स्वत:ला जाळून घेणे, इमारतीवरून उडी मारून वा रेल्वे या मार्गांचा आत्महत्येसाठी सर्रास वापर केला जात असल्याचे समोर आले आहे़
शहरातील १९९ आत्महत्या या गळफास, ५९ विषारी औषध सेवनाने तर १८ जणांनी पाण्यात जीव देऊन आत्महत्या केली आहे़ सिडको परिसराचा अंतर्भाव असलेले अंबड पोलीस ठाणे, नाशिकरोड व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत़ यामध्ये अल्पवयीन मुलांसह वयोवृद्धांचाही समावेश आहे.
काही आत्महत्या या केवळ
क्षणिक संतापातून झालेल्या
आहेत़