बेलगाव कुऱ्हेत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 17:56 IST2021-01-11T17:56:05+5:302021-01-11T17:56:30+5:30

नांदुरवैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील मारुती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ३२व्या अखंड हरिनाम सप्ताहाची कीर्तनकार माधव काजळे यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. या वर्षीही परिसरातून अनेक नामवंत गायक, वादक, प्रबोधनकार व परिसरातील अनेक भाविकांनी सप्ताहास हजेरी लावली.

End of Akhand Harinam Week in Belgaum Kurhet | बेलगाव कुऱ्हेत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

बेलगाव कुऱ्हेत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

सप्ताहामध्ये पहाटे काकडा भजन, गाथा पारायण, हरिपाठ, तसेच सातही दिवस चाललेल्या या कीर्तन महोत्सवात सात वेगवेगळ्या विषयांवर कीर्तनकारांनी ज्ञानप्रबोधन केले. यावेळी झालेल्या कीर्तनातून देशसेवा, तसेच देवाचे नामस्मरण करा, साधुसंतांची सेवा करा, असे कीर्तनकारांनी आवाहन केले. सप्ताह समितीच्या वतीने माधव महाराज काजळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर, दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यानंतर, सायंकाळी कलश घेत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. सप्ताहामध्ये मठाधिपती माधव घुले, राजाराम मुसळे, उत्तम गुळवे, देवराम गायकवाड, नामदेव डोळस, तुकाराम गाथा, मनोहर सायखेडे, अशोक महाराज धांडे आदींनी आपली सेवा हरीचरणी अर्पण करत ज्ञानप्रबोधन केले.

Web Title: End of Akhand Harinam Week in Belgaum Kurhet