अतिक्रमित ओटे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:11 IST2018-10-31T00:09:43+5:302018-10-31T00:11:28+5:30

महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने मंगळवारी (दि़ ३०) मुरारीनगरमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतिक्रमण पथकाने नागरिकांनी घरासमोर केलेले ओट्यांचे अतिक्रमण काढले़ तसेच स्वामी समर्थ केंद्राजवळील सभामंडपही जमीनदोस्त करण्यात आला़

 Encroachment lane rocks | अतिक्रमित ओटे जमीनदोस्त

अतिक्रमित ओटे जमीनदोस्त

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने मंगळवारी (दि़ ३०) मुरारीनगरमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतिक्रमण पथकाने नागरिकांनी घरासमोर केलेले ओट्यांचे अतिक्रमण काढले़ तसेच स्वामी समर्थ केंद्राजवळील सभामंडपही जमीनदोस्त करण्यात आला़
विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यातच सिडकोत गेल्या काही दिवसापासून थांबलेली मोहीम पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोहिमेत मनपाने मुरारीनगर येथील सभामंडप तसेच घरालगतचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले़

Web Title:  Encroachment lane rocks