शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पुतण्याला सक्तमजुरी

By admin | Updated: February 28, 2017 01:21 IST

काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पुतण्याला सक्तमजुरी

नाशिक : शेतात मिरचीचे रोप लावण्याच्या कारणावरून काका-काकूला पुतण्याने मोगरीने केलेल्या मारहाणीत काकाचा मृत्यू झाल्याची घटना कळवण तालुक्यातील माळगाव येथे २०१५ ला घडली होती़ जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात न्यायाधीश एऩ के.ब्रह्मे यांनी आरोपी राजेंद्र भाऊराव गायकवाड (२६, रा़ माळगाव, ता़ कळवण, जि़ नाशिक) या पुतण्याला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी ठरवत सोमवारी (दि़२७) आठ वर्षे सक्तमजुरी व चौदा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी १२ साक्षीदार तपासले़ या साक्षीदारांमध्ये मयत गुलाब गायकवाड यांची पत्नी रजूबाई व व एका नऊ वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायालयाने फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद तसेच समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार आरोपी राजेंद्र गायकवाड यास मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०४(२) अन्वये आठ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तर भारतीय दंड विधान कलम ३२४ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत आरोपी राजेंद्र गायकवाड याने काँक्रीट शिक्षा भोगावयाच्या असून, दंडाच्या रकमेतील दहा हजार रुपये फिर्यादी रजूबाई गायकवाड यांना देण्यात यावे, असे म्हटले आहे़ या खटल्यातील आरोपी राजेंद्र गायकवाड हा घटना घडल्यापासून कारागृहात आहे़ (प्रतिनिधी)